मानव विकास निर्देशांक (Human Development Index)
by Prof. Yogesh Bharaskar
मानव संसाधन हे कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात महत्वाची भूमिका बजावते. उत्पादनाच्या श्रम या एकमेव सक्रीय घटकाचा पुरवठा मानवी संसाधनातूनच होतो. यांत्रिकीकरणाच्या युगातदेखील शेती, उद्योग व सेवा क्षेत्रात मानवी संसाधनाचे महत्व टिकून आहे. परंतु निरक्षर व्यक्तींचे मोठे प्रमाण, शिक्षण व प्रशिक्षणाच्या सुविधांची कमतरता किंवा त्यांचा निकृष्टपणा, श्रमशक्तीमध्ये अकुशल कामगारांचा मोठा भरणा यामुळे अल्पविकसित व विकसनशील देशांमधील मानवी संसाधन निकृष्ट दर्जाचे मानले जाते. त्यामुळे देशातील श्रमशक्ति सुशिक्षित, प्रशिक्षित, निश्चय, उद्योगी, गुणवत्तापूर्ण, देशप्रेमाने झपाटलेली असणे महत्त्वाचे ठरते. ॲडम स्मिथ यांच्या मते, “Prosperity of a country is determined by the skill, efficiency and attitude of the labour used by that country.” मानव संसाधनाची प्रवृत्ती, इच्छाशक्ती, क्षमता आणि कौशल्याच्या जोरावर जगातील अनेक देशांनी वेगवान आर्थिक विकासाचे ध्येय साध्य केल्याचे दिसून येते. उदा. जपान, सिंगापूर, जर्मनी हॉंगकॉंग, चीन, इत्यादी.
ज्याप्रमाणे उत्पादकता वाढविण्यासाठी
यंत्रांमध्ये व तंत्रज्ञानामध्ये सातत्याने सुधारणा करून तंत्रज्ञान अद्ययावत
ठेवण्यावर भर दिला जातो. त्याचप्रमाणे मानवी संसाधनाची उत्पादकता व क्षमता यामध्ये
सातत्याने सुधारणा करणे आवश्यक ठरते.
मानव विकास संकल्पना:
देशाचा आर्थिक विकास मोजण्यासाठी व दोन राष्ट्रांच्या विकास प्रक्रियेची तुलना करण्यासाठी गेली अनेक वर्षे राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नातील वाढ हे दोन निकष वापरले जात आहेत. परंतु हे दोन्ही निर्देशक संख्यात्मक असून त्यावरून विकासाचे वास्तव चित्र प्राप्त होत नाही. याची प्रचिती आल्याने आर्थिक विकासाचे पर्यायी निर्देशक शोधण्याच्या प्रयत्नांना वेग आला. या प्रयत्नांचा भाग म्हणून 1990 मध्ये मानव विकास ही संकल्पना उदयास आली. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने (UNDP) 1990 मध्ये प्रकाशित केलेल्या मानव विकास अहवालात मानव विकास ही संकल्पना सर्वप्रथम मांडण्यात आली. पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ मेहबूब उल हक आणि नोबेल पारितोषिक विजेते भारतीय अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी मानव विकास ही संकल्पना विकसित करण्यात व मानव विकास मोजण्यासाठी निर्देशांक तयार करण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे.
मेहबूब उल हक यांच्या मते, “आर्थिक वृद्धी आणि मानवी विकास यातील
मूलभूत फरक म्हणजे आर्थिक वृद्धीचा संबंध फक्त उत्पन्नाच्या वाढीशी असतो तर मानवी
विकासाचा संबंध मानवी जीवनाशी निगडित आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय
घटकांशी असतो.”
"एखाद्या देशात सर्वसामान्य लोकांना मिळणाऱ्या संधीचा व निवडीचा परिघ वाढवत नेण्याची प्रक्रिया म्हणजे मानवविकास होय." - मानव विकास अहवाल 1997
"एखाद्या देशात सर्वसामान्य लोकांना मिळणाऱ्या संधीचा व निवडीचा परिघ वाढवत नेण्याची प्रक्रिया म्हणजे मानवविकास होय." - मानव विकास अहवाल 1997
सॅम्युएल्सन यांच्या मते, “मानवी विकास म्हणजे मनुष्याची शारीरिक व बौद्धिक कार्यक्षमता वाढविण्यात आलेले यश होय.”
1990 मध्ये मेहबूब उल हक व अमर्त्य सेन यांच्या प्रेरणेतून संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांतर्गत जागतिक पातळीवर पहिला मानव विकास अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. प्रत्येक व्यक्ती जीवन जगतांना आरोग्य, शिक्षण व चांगले जीवनमान यासाठी धडपडत असते. या संघर्षामध्ये व्यक्ती बरोबरच संपूर्ण समाज व राष्ट्र सहभागी झालेले असते. म्हणूनच अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत घटकांबरोबरच आरोग्य, शिक्षण, चांगले जीवनमान, सुरक्षित पर्यावरण, स्वातंत्र्य, समानता, स्वच्छ पिण्याचे पाणी, अन्नसुरक्षितता, इत्यादी घटकांना देखील मानवी विकासाच्या संदर्भात महत्त्व प्राप्त झाले आहे. मानव विकास अहवालामध्ये मानव विकासात आरोग्य, शिक्षण व जीवनमानाबरोबरच, लिंगनिरपेक्ष सामाजिक विकास, स्त्री-पुरुषांचे समान सक्षमीकरण, मानवी दारिद्र्य, मानवी राहणीमान, पोषण, बालमृत्यूदर, रोजगार, साक्षरता दर, या घटकांना देखील महत्त्व दिले गेले. त्यानुसार मानवी कल्याणाच्या मापदंडाची निर्मिती व त्याचे मोजमाप या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्यात आले. त्यातून 1990 मध्ये मानव विकास निर्देशांक (HDI), 2010 मध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (MPI), असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक (IHDI), लिंगभाव असमानता निर्देशांक (GII), व 2014 मध्ये लिंगभाव विकास निर्देशांक (GDI) असे प्रमुख निर्देशक तयार करण्यात आले.
यापूर्वी वापरात असलेल्या भौतिक जीवनमान निर्देशांकातील (PQLI) त्रुटी लक्षात घेऊन मेहबूब उल हक यांनी 1990 मध्ये मानवी जीवनमानाच्या संदर्भात सुधारित निर्देशांकाची मांडणी केली. त्यालाच मानव विकास निर्देशांक असे म्हणतात. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम 1990 पासून दरवर्षी जगातील विविध देशांच्या (सध्या 189 देश) मानव विकास स्थितीचा अभ्यास करून जागतिक क्रमवारी प्रसिद्ध करते. दीर्घ आणि निरोगी जीवन, ज्ञानप्राप्ती व राहणीमानाचा दर्जा या तीन घटकांचे मूल्य काढून प्रत्येक घटकाचा स्वतंत्र निर्देशांक तयार केला जातो. दीर्घ आणि निरोगी जीवनाचे आकलन होण्यासाठी व्यक्तीचे जन्मावेळी अपेक्षित सरासरी आयुर्मान, ज्ञानप्राप्तीच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी व्यक्तीने शिक्षणामध्ये व्यतीत केलेली सरासरी वर्षे व शिक्षणासाठी लागणारी अपेक्षित वर्ष आणि जीवनमानाचा दर्जा मोजण्यासाठी दरडोई उत्पन्न विचारात घेतले जाते. या तिन्ही घटकांची आकडेवारी गोळा करून एकत्रित सर्वसमावेशक असा मानव विकास निर्देशांक तयार केला जातो.
मानव विकास निर्देशांकाचे घटक:
१. दीर्घ आणि निरोगी जीवन (Long & Healthy Life):
दीर्घ आणि निरोगी जीवन यांचे मापन करण्यासाठी जन्मावेळीचे अपेक्षित आयुर्मान निर्देशक वापरला जातो. अपेक्षित आयुर्मान किंवा अपेक्षित दीर्घायुष्य म्हणजे जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे आयुष्य होय. जन्माला आलेले प्रत्येक बालक किती वर्ष जगण्याची अपेक्षा करू शकते. त्याची सरासरी म्हणजे अपेक्षित आयुर्मान होय. व्यक्तीचे सरासरी आयुर्मान देशपरत्वे भिन्न असल्याचे दिसून येते. (उदा. मानव विकास अहवाल 2019 नुसार भारतीयांचे सरासरी आयुर्मान 69.4 वर्ष आहे. हॉंगकॉंग सर्वाधिक 84.7 वर्ष तर मध्य आफ्रिकी गणराज्यचे सरासरी आयुर्मान सर्वात कमी 52.8 वर्ष इतके आहे.) जन्माला येणारे प्रत्येक बालक सामान्यपणे किती वर्ष जगण्याची अपेक्षा करू शकते यावर अनेक घटक परिणाम करतात. यामध्ये देशांमध्ये उपलब्ध असणाऱ्या आरोग्यविषयक सुविधांचा प्रामुख्याने परिणाम होतो. त्यामुळे आपोआपच अपेक्षित आयुर्मान हा निर्देशक देशातील आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेचे देखील मोजमाप करतो. हा निर्देशांक तयार करताना मानवी आरोग्याशी संबंधित कुपोषण, बालमृत्यू दर, एकूण मृत्युदर, आरोग्य सुविधांवर होणारा खर्च, साथीच्या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या, लसीकरणाची स्थिती, इ विविध घटकांचा अभ्यास केला जातो.
व्हिडीओ लेक्चर पहा: https://youtu.be/MmON7zWKI10
२. ज्ञान प्राप्ती/ शैक्षणिक संपादणूक (Educational Attainment):
ज्ञान प्राप्ती/ शैक्षणिक संपादणूक या घटकाचे मोजमाप दोन भागांमध्ये केले जाते.
अ) शिक्षणामध्ये व्यतीत केलेली सरासरी वर्षे (Mean years of schooling)
ब) शिक्षणासाठी लागणारी अपेक्षित वर्षे (Expected years of schooling)
शिक्षणामध्ये व्यतीत केलेली सरासरी वर्षे मोजण्यासाठी 25 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या प्रौढांनी शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर शिक्षणामध्ये व्यतीत केलेल्या वर्षांची सरासरी घेतली जाते. तर शिक्षणासाठी लागणारी अपेक्षित वर्षे मोजण्यासाठी शाळायोग्य वयाच्या बालकांना शाळेत प्रवेश केल्यानंतर शिक्षण पूर्ण करण्यासाठी लागणारी अपेक्षित वर्षे लक्षात घेतली जातात. शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावरील शाळायोग्य वयाच्या बालकांची एकूण लोकसंख्या या दोन घटकांवरून शिक्षणासाठी लागणारी अपेक्षित वर्षे मोजली जातात.
येथे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, शिक्षणाच्या प्रत्येक स्तराचा कालावधी देशानुसार वेगवेगळा असू शकतो म्हणूनच शिक्षणाच्या सरासरी आणि अपेक्षित वर्षांची गणना करताना हे विचारात घेतले जाते.
शैक्षणिक प्राप्तीचा निर्देशांक काढताना शिक्षणामध्ये व्यतीत केलेली सरासरी वर्षे व शिक्षणासाठी लागणारी अपेक्षित वर्षे या घटकांशिवाय शिक्षणावर होणारा सरकारी खर्च, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन स्तरावरील संयुक्त पटनोंदणी दर, प्रौढ साक्षरता दर, शाळांमधील इंटरनेटची उपलब्धता, शिक्षकांचे प्रशिक्षण, विद्यार्थी-शिक्षक प्रमाण, शिक्षणातील गळतीचे प्रमाण, इत्यादी बाबींचा अभ्यास केला जातो.
३. चांगले जीवनमान (Decent standard of living):
मानव विकास निर्देशांकातील तिसरा महत्त्वाचा निर्देशक म्हणजे जीवनमानाचा दर्जा होय. जीवनमानाचे मापन करण्यासाठी क्रयशक्ती समतेवर आधारित (Purchasing Power Parity) वास्तविक दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न (GNI) विचारात घेतले जाते. कोणत्याही व्यक्तीला दीर्घायुष्य आणि ज्ञानप्राप्ती शिवाय आयुष्यभरात असंख्य वस्तू मिळविण्याची इच्छा असते. व्यक्तीला इच्छा असलेल्या वस्तू चांगले जीवनमान व्यतीत करण्यासाठी आवश्यक असतात. व्यक्तीचे उत्पन्न अशा वस्तू प्राप्त करण्याचे प्रमुख साधन आहे. व्यक्तीच्या उत्पन्नावरूनच व्यक्तीचे राहणीमान किंवा जीवनमानाचा दर्जा ठरत असतो. त्यामुळे देशाचे दरडोई उत्पन्न हा निर्देशक जीवनमानाचा दर्जा निश्चित करण्यासाठी वापरला जातो.
घटक निर्देशांक काढण्याचे सूत्र/पद्धती:
मानव विकास निर्देशांकाच्या दीर्घ आणि निरोगी जीवन, ज्ञानप्राप्ती व राहणीमानाचा दर्जा या तीन घटकांचे मूल्य काढून प्रत्येक घटकाचा स्वतंत्र निर्देशांक तयार केला जातो. त्यासाठी पुढील सूत्राचा वापर केला जातो.
वास्तव मूल्य - न्यूनतम मूल्य
घटक निर्देशांक = ------------------------------------
महत्तम मूल्य - न्यूनतम मूल्य
घटक निर्देशांकाचे मूल्य काढण्यासाठी प्रत्येक घटकाचे न्यूनतम मूल्य व महत्तम मूल्य UNDP निश्चित करते. 2014 च्या जागतिक विकास अहवालानुसार घटक निर्देशांक काढण्यासाठी निश्चित केलेले न्यूनतम मूल्य व महत्तम मूल्य पुढील प्रमाणे आहे.
१. आयुर्मान निर्देशांक (Life Expectancy Index):
आयुर्मान निर्देशांक काढण्यासाठी न्यूनतम मूल्य व महत्तम मूल्य 20 वर्ष ते 85 वर्ष या मर्यादेत निश्चित करण्यात आले आहे. देशाच्या सरासरी आयुर्मानाचे वास्तव मूल्य आणि न्यूनतम मूल्य व महत्तम मूल्य सूत्रामध्ये टाकून आयुर्मान निर्देशांक काढला जातो.
सरासरी आयुर्मान - 20
आयुर्मान निर्देशांक = ------------------------------
85 - 20
जेव्हा देशाचे सरासरी आयुर्मान 85 असते तेव्हा निर्देशांक 1 असतो आणि जेव्हा ते 20 असते तेव्हा निर्देशांक 0 असतो.
२. शैक्षणिक निर्देशांक (Education Index):
सरासरी शालेय वर्ष निर्देशांक काढण्यासाठी न्यूनतम मूल्य व महत्तम मूल्य 0 वर्ष ते 15 वर्ष या मर्यादेत निश्चित करण्यात आले आहे तर अपेक्षित शालेय वर्ष निर्देशांक काढण्यासाठी न्यूनतम मूल्य व महत्तम मूल्य 0 ते 18 वर्ष या मर्यादेत निश्चित करण्यात आले आहे. देशातील सरासरी शालेय वर्ष व अपेक्षित शालेय वर्षाचे वास्तव मूल्य सूत्रामध्ये टाकून सरासरी शालेय वर्ष निर्देशांक व अपेक्षित शालेय वर्ष निर्देशांक असे दोन भिन्न निर्देशांक तयार केले जातात. त्यांचा गणितीय मध्य काढून शैक्षणिक निर्देशांक तयार केला जातो.
सरासरी शालेय शिक्षण वर्ष - 0
सरासरी शालेय शिक्षण वर्ष निर्देशांक = ----------------------------------------
15 - 0
अपेक्षित शालेय शिक्षण वर्ष - 0
अपेक्षित शालेय शिक्षण वर्ष निर्देशांक = ----------------------------------------
18 - 0
सरासरी शा. शि. वर्ष निर्देशांक + अपेक्षित शा. शि. वर्ष निर्देशांक
शैक्षणिक निर्देशांक = ----------------------------------------------------------------------
2
३. उत्पन्न निर्देशांक (Income Index):
उत्पन्न निर्देशांक काढण्यासाठी न्यूनतम मूल्य व महत्तम मूल्य 100 US $ ते 75000 US $ या मर्यादेत निश्चित करण्यात आले आहे. देशाचे दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न आणि न्यूनतम मूल्य व महत्तम मूल्य सूत्रामध्ये टाकून उत्पन्न निर्देशांक काढला जातो. उत्पन्नाचे खरेदी शक्तीमध्ये रुपांतर करण्यासाठी मुल्यांचा log घेतला जातो. त्यासाठी सूत्रामध्ये थोडा बदल केला जातो.
log(दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न) - log(100)
उत्पन्न निर्देशांक = ---------------------------------------------------
log(75000) - log(100)
जेव्हा दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न हे 75000 अमेरिकन डॉलर असते. तेव्हा हा निर्देशांक 1 असतो आणि जेव्हा ते 100 अमेरिकन डॉलर असते तेव्हा तो 0 असतो.
मानव विकास निर्देशांक निश्चिती :
मानवी विकास निर्देशांक हा वरील तीनही निर्देशांकाचा भूमितीय मध्य असतो. तीनही निर्देशांकांचा गुणाकार करून त्यांचे घनमूळ घेतले जाते. त्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते.
मानवी विकास निर्देशांक हा वरील तीनही निर्देशांकाचा भूमितीय मध्य असतो. तीनही निर्देशांकांचा गुणाकार करून त्यांचे घनमूळ घेतले जाते. त्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते.
मानव विकास निर्देशांक = ∛ (आयुर्मान निर्देशांक * शिक्षण निर्देशांक * उत्पन्न निर्देशांक)
उदाहरण:
वरील सर्व सूत्रांच्या सहाय्याने 2019 च्या मानव विकास अहवालातील मूल्य घेऊन भारताचा मानव विकास निर्देशांक पुढीलप्रमाणे काढला आहे.
उदाहरण:
वरील सर्व सूत्रांच्या सहाय्याने 2019 च्या मानव विकास अहवालातील मूल्य घेऊन भारताचा मानव विकास निर्देशांक पुढीलप्रमाणे काढला आहे.
व्हिडीओ लेक्चर पहा: https://youtu.be/MmON7zWKI10
२. शैक्षणिक निर्देशांक (Education Index):
३. उत्पन्न निर्देशांक (Income Index):
मानव विकास निर्देशांक 2019:
मानव विकास निर्देशांक 0 ते 1 च्या दरम्यान असतो, 0 म्हणजे मानव विकास झालेला नाही तर 1 म्हणजे पुर्ण मानव विकास होय. सध्या जगातील 193 देशांचा वरील पद्धतीने मानव विकास निर्देशांक काढला जातो. त्याआधारे देशांचे चार भागांमध्ये वर्गीकरण केले जाते.
३. उत्पन्न निर्देशांक (Income Index):
मानव विकास निर्देशांक 2019:
मानव विकास निर्देशांक 0 ते 1 च्या दरम्यान असतो, 0 म्हणजे मानव विकास झालेला नाही तर 1 म्हणजे पुर्ण मानव विकास होय. सध्या जगातील 193 देशांचा वरील पद्धतीने मानव विकास निर्देशांक काढला जातो. त्याआधारे देशांचे चार भागांमध्ये वर्गीकरण केले जाते.
मानव विकास अहवाल नुसार देशांचे वर्गीकरण:

मानव विकास अहवाल 2023 नुसार प्रमुख देश व भारत:
व्हिडीओ लेक्चर पहा: https://youtu.be/MmON7zWKI10
संदर्भ:
http://hdr.undp.org/sites/default/files/reports/270/hdr_2010_en_complete_reprint.pdf
http://hdr.undp.org/sites/default/files/hdi_training.pdf
http://hdr.undp.org/sites/default/files/2018_human_development_statistical_update.pdf
http://hdr.undp.org/sites/default/files/hdr2019.pdf
http://hdr.undp.org/sites/default/files/2019_hdr_calculating_indices_final.xls
https://hdr.undp.org/data-center/country-insights#/ranks

No comments:
Post a Comment